Last Updated: Saturday, January 11, 2014, 21:25
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या सचिव कार्यालयात ३१ जागा रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०१४ आहे. चला लागा लगेच कामाला.
महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव कार्यालय व राज्यपाल परिवार प्रबंधक कार्यालयात सहायक (३ जागा), लघुटंकलेखक (१ जागा), लिपिक टंकलेखक (४ जागा), संदेशवाहक (६ जागा), माली (५ जागा), सफाईगार/स्वच्छक (२ जागा), सहाय्यक-खाद्यपेय (४ जागा), प्लेट वॉशर (२ जागा), कचरा मजदूर (२ जागा), टेनिस बॉय (२ जागा), झिलाईकार-पॉलिशर (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
पत्ता राजभवन मुंबई, मलबार हिल, वाळकेश्वर रोड, मुंबई ४ ० ० ० ३ ५, दूरध्वनी क्रमांक (० २ २ ) २ ३ ६ ३ २ ३ ४ ३. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी ९ जानेवारी ते २७ जानेवारी २०१४ तर आवेदन शुल्क भरण्याचा कालावधी ११ जानेवारी ते २९ जानेवारी २०१४ आहे.
अधिक माहिती www.exxononline.net/rajbhavan या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, January 11, 2014, 21:25