Last Updated: Tuesday, January 28, 2014, 09:18
www.24taas.com, झी मीडिया,मुंबईमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील `लिपिक टंकलेख` (गट-क) या संवर्गातील रिक्त पदांवर नामनिर्देशनाद्वारे उमेदवारांची नियुक्ती करण्यात करण्यासाठी दि. २३ सप्टेंबर २०१३ रोजी जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, ही जाहिरात रद्द करून प्रक्रियाही रद्द करण्यात आली आहे. आता या पदांसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध कऱण्यात आली आहे. नव्याने करण्यात आलेल्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. याआधी ज्यांनी अर्ज केले होते त्यांना नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.
ऑनलाईन अर्ज दि. २८ जानेवारी २०१४ पासून सकाळी ११ वाजल्यापासून करता येणार आहेत. अधिक माहिती एमकेसीएलच्या वेबसाईटवर पाहता येईल.
http://oasis.mkcl.org/mls2014अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 28, 2014, 09:18