फेसबुकवर `सुसाइड नोट` लिहून फोटोग्राफरची आत्महत्या Man writes suicide note on FB before suicide

फेसबुकवर `सुसाइड नोट` लिहून फोटोग्राफरची आत्महत्या

फेसबुकवर `सुसाइड नोट` लिहून फोटोग्राफरची आत्महत्या
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आपल्या जीवनात घडत असलेल्या सगळ्या गोष्टी फेसबुकवर अपडेट करण्याकडे सर्वांचा कल पहायला मिळतो पण जर कुणी आपल्या मृत्यूची बातमी फेसबुकवर अपडेट करत असेल तर...

चेंबूरमधल्या 32 वर्षीय फोटोग्राफरनं, `हा आपल्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. आता मी राहू शकत नाही, बाय, लव्ह यू, टेक केअर ऑल...` असं स्टेटस टाकल्यानंतर आपल्या राहत्या घऱी आत्महत्या केली. दिवसभर फेसबुकवरून संकेत दिल्यानंतर काल दुपारी त्यानं गळफास लावून आत्महत्या केली.

प्रकाश पटणी असं त्याचं नाव असून कौटुंबिक कलहातून किंवा प्रेमभंगातून ही आत्महत्या केल्याचा संशय आहे. काही दिवसांपूर्वीच पत्नीने वेबकॅमवर आपल्या पतीसमोर आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता फेसबुकवर ‘सुसाइड नोट’ लिहून प्रकाशने आत्महत्या केल्याची घटना गंभीर आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, May 28, 2013, 18:45


comments powered by Disqus