पत्नीच्या `फेसबुक`वर पतीनं वाचले अश्लील मॅसेज आणि... , MARRIAGE IN TROUBLE BECAUSE OF FACEBOOK

पत्नीच्या `फेसबुक`वर पतीनं वाचले अश्लील मॅसेज आणि...

पत्नीच्या `फेसबुक`वर पतीनं वाचले अश्लील मॅसेज आणि...

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

फेसबुकवर मित्रांसोबत चॅटींग करणं एका विवाहितेला चांगलंच महागात पडलंय. या विवाहितेच्या पतीनं एके दिवशी तिचं अकाऊंट ओपन केलं तेव्हा पत्नीच्या प्रोफाईलमध्ये २५० फ्रेंड त्याला सापडले तसेच अनेक अश्लील आणि आपत्तीजनक पोस्टही त्यानं या प्रोफाईलवर पाहिले. यानंतर, पहिल्यांदा पतीन आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, काहीही फरक न पडल्यानं त्यानं शेवटी आपल्या पत्नीला तिच्या माहेरी धाडून दिलं.

या तरुणीचं माहेर उत्तरप्रदेशातल्या मुरादाबादमध्ये आहे. एका वर्षापूर्वी तीचं लग्न गाझियाबादच्या एका कम्प्यूटर इंजिनिअरसोबत तिचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांपर्यंत सर्व काही ठिकठाक सुरू होतं परंतु फेसबुकमुळे उभयतांमध्ये नाराजीचा सूर उमटत गेला.

२० डिसेंबर रोजी विवाहीतनं आपल्या सासरवर हुंड्याची मागणी करण्याचा आणि छळाचा आरोप केला. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिचा पती तिच्यावर विनाकारण संशय घेतो. त्याला आपण, फेसबुकवर आपल्या नातेवाईकांशी चॅट केलेलंदेखील खपत नाही.... तर पतीच्या म्हणण्यानुसार, फेसबुकवर पत्नीचे २५० पेक्षा जास्त मित्र आहेत. तिच्या मॅसेज बॉक्समध्ये अनेक अश्लील मॅसेजदेखील आढळले. फेसबुक सुरू ठेवण्याची मनाई केली तर तिनं भांडण केलं आणि आपल्या माहेरी निघून गेली. विवाहितेच्या म्हणण्यानुसार, पती आणि सासरच्या मंडळींनीच तिला घराबाहेर काढलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 29, 2013, 14:01


comments powered by Disqus