फेसबुकवर रशियाच्या मुलीशी मैत्री, भारतात लग्न!, Married with Facebook friend

फेसबुकवर रशियाच्या मुलीशी मैत्री, भारतात लग्न!

फेसबुकवर रशियाच्या मुलीशी मैत्री, भारतात लग्न!

www.24taas.com, कानपूर
लग्नाच्या गाठी स्वर्गातच निश्चित होत असतात, या भूतलावर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्या दोघा व्यक्तींची भेट होते. असे काहीसे घडले कानपूरच्या एका तरुणाच्या बाबतीत. कानपूरचा मुलगा आणि रशियाची मुलगी....

अगर जिसे दिले चाहो, उसे मिलाने के लिए पुरी कायनात कोई ना कोई रस्ता निकालती है हा ओम शांती ओममधील डायलॉग प्रत्यक्षात आला आहे. फेसबुकवर कानपूरच्या या तरुणाची रशियातील एका मुलीची भेट झाली. नंतर ओळख वाढली. हळूहळू या ओळखीचं रुपांतर प्रेमात झाले. आता दोघांनी देशांच्या सीमा झुगारत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुलगी कानपूरमध्ये मुलाला भेटायला आली. या दोघांनी धार्मिक रितीरिवाजप्रमाणे लग्न केल्यानंतर सिटी मॅजिस्ट्रेटकडे रिजिस्टर मॅरेजसाठी अर्ज केला आहे.

कानपूरचा अंकुर प्रताप सिंह आणि रशियाची एरिना सेंको यांनी लग्नासाठी अर्ज केल्याचे सिटी मॅजिस्ट्रेट अविनाश सिंग यांनी सांगितले. अविनाश सिंग यांनी रशियाच्या दुतावासाशी संपर्क केला आहे. रशियाच्या दुतावासाने मंजुरी दिल्यानंतर महिनाभरानंतर दोघेही कायदेशीररित्या पती-पत्नी होतील.

अंकुर आणि एरिना यांची प्रेमाची कहाणी एकदम फिल्मी आहे. अंकुर दुबईमध्ये काम कतो. तर एरिना रशियाच्या एका टेलिकॉम कंपनीत काम करते. दोघे २००८मध्ये फेसबुकमुळे मित्र झाले आणि हळूहळू या मैत्रिचं रुपांतर प्रेमात झाले. एरिनाला भेटायला अंकुर रशियातही जाऊन आला आहे. त्यावेळी त्याने तिच्या आई-वडिलांशीही भेट घेतली.

First Published: Thursday, January 10, 2013, 18:58


comments powered by Disqus