ही पाहा अल्टो 800, अडीच लाखाची गाडी, Maruti Alto 800 finally launched; starting price at Rs 2.44 lakh

ही पाहा अल्टो 800, अडीच लाखाची गाडी

ही पाहा अल्टो 800, अडीच लाखाची गाडी
www.24taas.com, मुंबई

मारूती सुझुकी कंपनी त्यांच्या अल्टो या मॉडलचं नवं वर्जन आज लॉन्च केली आहे. अल्टो 800 हे वर्जन आज लॉन्च झालं. 6 रंगांमध्ये अल्टो 800 बाजारात उतरणार आहे.

मार्केटमध्ये टाटा नॅनोला अल्टो 800 ओव्हरटेक करेल असा विश्वास कंपनीच्या अधिका-यांनी व्यक्त केलाय. अडीच ते तीन लाखांच्या दरम्यान या कारची किंमत असणार आहे. तर सीएनजीच्या मॉडेलची किंमत तीन ते साडेतीन लाखांच्या दरम्यान असणार आहे.

पेट्रोलवर चालणारी गाडी प्रती लिटर 23 किलोमीटरचं मायलेज देते. तर सीएनजीवरील अल्टो 800 प्रती किलोमीटर 31 किलोमीटरचा मायलेज देते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.


First Published: Tuesday, October 16, 2012, 17:05


comments powered by Disqus