Last Updated: Friday, June 13, 2014, 19:18
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्लीभारतीय मोबाईल कंपनी मायक्रोमॅक्सने दोन आठवड्याच्या आतच यूनाइट सीरिजचा दुसरा फोन बाजारात आणलाय. कंपनीचा यूनाइट 2A106 हा स्मार्टफोन बाजारात आल्यानंतर युनाइट A092 आता बाजारात आला आहे.
ह्या फोनमध्ये अॅन्ड्रॉईड जेली बीन 4.3 आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे की हा फोन 21 भाषांमध्ये असून आपल्याला हव्या त्या भाषेत संदेश पाठवू शकतो.
याचं स्क्रीन 4 इंचेचं असून रिझॉल्यूशन 800 x480 पिक्सेल आणि 16 एम कलर आहे. MSM8212 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर 1.2 जीएचजेड क्वॉड कोर प्रोसेसर आणि रॅम 1 जीबी आणि त्यात 2.99 जीबी इंटरनल मेमरी देखील आहे. मायक्रोमॅक्सच्या साईट वर 8 जीबी सांगण्यात आले आहे.
याच डिझाईन पहिल्या मॉडेलपेक्षा चांगला आहे. रियर कॅमेरा 5 एमपीचा आहे. त्यात व्हिडीओही करता येईल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 13, 2014, 19:18