कॅनव्हास ४ बाजारात, १७९९९ किंमत!, Micromax Canvas 4 launched in India at Rs 17,999

कॅनव्हास ४ बाजारात, १७९९९ किंमत!

कॅनव्हास ४ बाजारात, १७९९९ किंमत!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मोबाईल प्रेमीसाठी एक खुशखबर... गेल्या काही दिवसांपासून सर्व ज्याची वाट पाहत होते, तो मायक्रोमॅक्सचा कॅनव्हास ४ हा फोन लॉन्च झाला आहे. स्मार्ट फोन सिरिजमधील हा फोन केवळ १७,९९९ रुपयांना तुम्हांला मिळू शकणार आहे.

कॅनव्हास ४ हा कॅनव्हास एचडीला रिप्लेस करणारा स्मार्ट फोन आहे. मायक्रोमॅक्सचा कॅनव्हास ४ हा ५ इंचाचा एचडी डिस्प्ले आमि १.२ गिगाहर्ट्सचा क्वार्ड कोअर प्रोसेसने परिपूर्ण आहे.

या आठवड्याच्या अखेरीस तो दुकानांमध्ये् उपलब्धर होईल. हा फोन तुमच्याव इशा-यावर नाचणारा आहे. तुमचे एक चुंबन फोनला अनलॉक करु शकते. आहे ना खास?

काय आहे कॅनव्हास ४ मध्ये

* अँड्राइड 4.2.1 जेली बेन

* 5.0-इंच एचडी (720x1280) डिस्प्ले

* 1.2GHz गिगाहर्ट्सचा क्वार्ड कोअर प्रोसेस

* 1GB रॅम

* 16GB इंटरनल स्टोअरेज (एस्पांडेबल 32GB मायक्रो एसडी कार्ड)

* 13 मेगा पिक्सलचा मागील कॅमेरा

* 5 मेगा पिक्सलचा पुढील कॅमेरा

* 2,000mAH बॅटरी

* कनेक्टीवीट ऑपशन Wi-Fi, GPS, Bluetooth, etc.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 8, 2013, 18:13


comments powered by Disqus