मायक्रोमॅक्स कॅनवस कलर्स A120 लॉन्‍च micromax canvas colors A120 launch

मायक्रोमॅक्स कॅनवस कलर्स A120 लॉन्‍च

मायक्रोमॅक्स कॅनवस कलर्स A120 लॉन्‍च
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मायक्रोमॅक्स कंपनीने नवीन डुअल सिम स्मार्टफोन कॅनवस कलर्स A120 लॉन्‍च केला आहे. याची किंमत कंपनीने 10 हजार रूपयांपेक्षा कमी ठेवली आहे. स्नॅपडीलवर हा सेलफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्नॅपडीलवर या स्मार्टफोनची किंमत 10 हजार 194 रूपये इतकी आहे. तर ebay वर याच सेलफोनची किंमत 9 हजार 899 रूपये इतकी आहे. हा स्मार्टफोन पाच रंगात उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनची स्क्रीन 5 इंच असून रिझोल्यूशन 1280x720 पिक्सल आहे. याच वैशिष्ठ म्हणजे हा अॅन्ड्रोइड 4.2 वर चालणारा स्मार्टफोन असून, मीडिया टेक 1.3Ghz कॉडकोर प्रॉसेसर एमटी 6582 आहे. या स्मार्टफोनचा रॅम 1 जीबी आहे. यात दोन कॅमेरा असून, बॅक कॅमेरा ऑटो फोकस रियरचा आहे, तसेच हा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. सेलचा फ्रंट कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. यातून एचडी वीडियो रिकॉर्डिंग होते.

या स्मार्टफोनच्या इतर फीचर्समध्ये 3जी, 2जी, वाय-फाय, जीपीएस आणि ब्लू टूथ 4.0 आहे. हा स्मार्टफोन पिवळा, निळा, हिरवा, लाल आणि काळ्या रंगात मिळतोय. याची बॅटरी 2000 एमएएच इतकी असून, ही बॅटरी 7 तासांचा टॉक टाइम देते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 30, 2014, 18:00


comments powered by Disqus