मायक्रोमॅक्स कॅनव्हास एलान्झा २ होणार लॉन्च, Micromax Canvas Elanza 2 Listed on Companys Site

मायक्रोमॅक्स कॅनव्हास एलान्झा २ होणार लॉन्च

मायक्रोमॅक्स कॅनव्हास एलान्झा २ होणार लॉन्च
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मायक्रोमॅक्स कॅनव्हास एलान्झा २ लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाईटवर त्याचा फर्स्ट लूक दिसत आहे. या फोनची अद्याप किंमत अजून समजली नाही, तसेच याची विक्री कधीपासून सुरू होणार हे देखील निश्चित सांगितले नाही.

यापूर्वी कॅनव्हास एलान्झा या वर्षी फेब्रुवारीत ८९०० रुपयांना लॉन्च करण्यात आला होता.

मायक्रोमॅक्स कॅनव्हास एलान्झा २ हा एन्ड्राइड ४.३ जेली बीनवर चालणार आहे. मायक्रोमॅक्सचा हा सर्वात लेटेस्ट एन्ड्राइड फोन आहे.

मायक्रोमॅक्स कॅनव्हास एलान्झा २ ड्यूल-सिम सपॉर्ट करतो, यात 1280x720 पिक्सल्स रेझ्युलूशनचा 5 इंचाचा टीएफटी डिस्प्ले आहे. यात 1.2 गीगाहर्त्ज क्वॉड-कोर क्वॉलकॉम स्नैपड्रैगन 200 (MSM8212) प्रोसेसर आहे आणि एक जीबी रॅम आहे.

मागील एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा कॅमरा आहे. 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमरा आहे. 4 जीबी इनबिल्ट स्टॉरेज आहे. 32 जीबीपर्यंत मायक्रो-एसडी कार्ड टाकता येते.

बॅटरी 2000mAh क्षमतेची आहे. 2G वर 240 तास स्टँडबाय टाइम आणि 7.5 तासाचा टॉक टाइम मिळतो. कनेक्टिविटी ऑप्शनमध्ये ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस/ए-जीपीएस, जीपीआरएस/एज आणि 3G आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 9, 2014, 17:43


comments powered by Disqus