Last Updated: Thursday, January 30, 2014, 12:25
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईभारतात मायक्रोमॅक्सने A200 कॅन्व्हास टर्बो मिनी हा स्मार्ट फोन लाँच केलाय. A200 कॅन्व्हास फ्लिपकार्टवर 14,490 रुपयांना आहे. मायक्रोमॅक्सच्या साईटवर यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.
हे फ्लॅगशिप फोन कॅन्व्हास टर्बोचं कॉम्पॅक्ट व्हर्जन आहे. 4.7 इंच 720पी आयपीएस डिस्प्ले कॅन्व्हास टर्बो मिनीमध्ये आहे. तसेच यात 1.3GHz क्वॉड कोअर आणि 1GB रॅम देण्यात आलीय.
या फोनची किंमत १४ हजार ५०० रूपये असेल, अशी शक्यता आहे.
या मॉडेलमध्ये 8 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे आणि 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. त्यासोबतच 1800mAh क्षमतेची बॅटरी असून 4GB इंटर्नल स्टोअरेज आहे. त्याच प्रमाणे ड्यूएल सीम हँडसेटमध्ये 3जी, वायफाय आणि ब्ल्युटूथची सुविधेसह अनेक महत्वाचे फिचर्स यात देण्यात आले आहेत.
कॅन्व्हास टर्बो मिनी काळा, पांढरा आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. 4.2.2 अँड्रॉईड जेली बीन व्हर्जन यात आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 30, 2014, 12:25