हा घ्या स्वस्तातला मायक्रोमॅक्सचा नवा टॅब्लेट..., micromax new funbook tablet

हा घ्या स्वस्तातला मायक्रोमॅक्सचा नवा टॅब्लेट...

हा घ्या स्वस्तातला मायक्रोमॅक्सचा नवा टॅब्लेट...
www.24taas.com, मुंबई

टॅब्लेट आता तरूणाईची गरज बनत चालली आहे. टॅब्लेट हे आज खास असं नवं माध्यमच झालं आहे. त्यामुळे आता मार्केटमध्येही कमीत कमी किंमतीत खास टॅब्लेट उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

मायक्रोमॅक्‍सने नवा टॅब्‍लेट`फनबुक इन्‍फिनिटी` नावाच्‍या आणखी एका टॅब्‍लेटची भर घातली आहे. हा टॅब्‍लेट अँड्राईड 4.0 वर काम करतो. आणि याचा डिस्‍प्‍ले हा सात इंच इतका आहे. कंपनीने हा टॅब्‍लेट स्‍वस्‍तातील टॅब्‍लेट वापरणा-या ग्राहकांसाठी तयार केला आहे. आगामी भारतीय उत्‍सवांच्‍या काळात 6,999 रूपयांचा हा टॅब्‍लेट लोकांना मोठया प्रमाणात आ‍कर्षित करेल अशी कंपनीला अपेक्षा आहे.

यामध्‍ये 1.2 GHz Cortex A8 प्रोसेसर लावण्‍यात आले आहे. या टॅब्‍लेटची इंटर्नल मेमरी 4 जीबी इतकी असून ती 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. या टॅब्‍लेटला 3 जी डोंगल सपोर्ट आणि वाय-फाय कनेक्टिविटीची सुविधा आहे. याचा रिअर कॅमेरा 2 मेगापिक्‍सलचा तर फ्रंट कॅमेरा हा 0.3 मेगापिक्‍सलचा आहे.


First Published: Thursday, October 4, 2012, 16:27


comments powered by Disqus