Last Updated: Thursday, March 6, 2014, 15:35
www.24taas.com, झी मीडिया, बरेलीएका हरवलेल्या मुलाला पोलिसांनी वॉटस अॅपच्या मदतीने शोधून काढला आहे. हा मुलगा ११ वर्षांचा आहे.
मुलगा हरवल्याची तक्रार जेव्हा पोलिसांकडे आली, तेव्हा त्यांनी वॉटस अॅपवर हरवलेल्या मुलाचे फोटो अपलोड केले.
वॉटस अॅपवर अनेकांनी आपल्या मित्रांना हा फोटो फॉरवर्ड केला.
हा फोटो रेल्वेत प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या मोबाईलवरही आला. त्याने हा फोटो पाहिला तेव्हा त्याच्या समोरच्या सीटवर बसलेला मुलगा आणि फोटोत दिसणारा मुलगा सारखाच होता.
फोटोसोबत या मुलाचं नाव आणि पत्ताही देण्यात आला होता. या व्यक्तीने त्या मुलाला त्याचं नाव आणि गाव विचारल्यावर त्याने बरोबर सांगितलं तेव्हा, या व्यक्तीने या मुलाला पोलिसांच्या स्वाधीन केलं.
वॉटस अॅपच्या मदतीने या मुलाचा शोध लागल्याचा दावा बरेली पोलिसांनी केला आहे. हा मुलगा हरवला तेव्हा छापलेल्या एका पत्रकाचा फोटो त्यांनी वॉटस अॅपवरही सर्व ग्रुप आणि मित्रांना पाठवला.
हा मुलगा हरवला कसा, हे गौडबंगाल अजूनही कायम आहे. या मुलाच्या वडिलांचं बरेलीत मिठाईचं दुकान आहे.
हा मुलगा सकाळी सायरकल फिरवायला निघाला होता. मात्र तो रात्री उशीरापर्यंत न परतल्याने, त्याच्या पाल्यांनी हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली.
हा मुलगा अजूनही घाबरलेला दिसून येतोय, त्यामुळे तो नेमका रेल्वेत कसा आणि कुणाच्या सांगण्यावरून, अथवा त्याला कोण घेऊन गेलं, हे अजून तरी स्पष्ट दिसत नाहीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 6, 2014, 15:35