आता फोनवरही करा पासपोर्टसाठी अर्ज..., Mobile application for passport apply

आता फोनवरही करा पासपोर्टसाठी अर्ज...

आता फोनवरही करा पासपोर्टसाठी अर्ज...

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

पासपोर्टसाठी अर्ज दाखल करणं आता आणखी सोप्पं होणार आहे. परदेश मंत्रालयानं लवकरच एक ‘मोबाईल अॅप्लिकेशन’ लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे तुम्ही केवळ अर्जच दाखल करू शकणार नाहीत तर यासाठी भरावं लागणारं शुल्कदेखील फोनवरून भरू शकता.

मोबाईल पासपोर्ट सेवेचं हे ‘अपग्रेडेड व्हर्जन’ असेल. अॅन्ड्रॉईड, आयओएस आणि विंडोज फोनसाठी हे मोबाईल अॅप्लिकेशन उपलब्ध असेल.

सध्या पासपोर्टच्या मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये यूजर्स केवळ प्राथमिक माहिती म्हणजेच जवळचं पासपोर्ट केंद्र, पोलीस स्टेशनबद्दलची माहिती, फीबद्दल माहिती तसंच आपला अर्ज कुठपर्यंत पोहचलाय याबद्दलची माहिती मिळवू शकतात. यामध्ये आता आणखी सुविधांची भर पडणार आहे.

परदेश मंत्रालयाचे तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सल्लागार आणि अध्यक्ष गोलोक कुमार सिमली यांच्या म्हणण्यानुसार, या अॅप्लिकेशनद्वारे अर्ज करणं आणि फी जमा करणं आणखीनच सोप्पं होईल. हे अॅप्लिकेशन येत्या दीड महिन्यांच्या काळात उपलब्ध होऊ शकेल. टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेसनं हे अॅप्लिकेशन बनवण्याच्या कामात व्यस्त आहे. लवकरच या मोबाईल अॅप्लिकेशनचं काम पूर्ण करून ते परदेश मंत्रालयाकडे सोपवण्यात येईल.

कसा कराल या अॅप्लिकेशनचा वापर…
> यूजर्सला सर्वात प्रथम हे मोबाईल अॅप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावं लागेल
> लॉग इन करून अर्ज भरा... तसंच तुम्ही आपल्या अर्जाचं स्टेटसही इथं पाहू शकाल.
> पण जोडलेल्या सर्व दस्तऐवज कागदी स्वरुपात तुम्हाला तुमच्या जवळ बाळगावं लागेल.
> एआरएन नंबर मिळाल्यानंतर आणि अपॉईंटमेन्टची तारीख मिळाल्यानंतर जवळच्या पासपोर्ट केंद्रात जाऊन हे दस्तऐवज तुम्हाला जमा करावे लागतील.

First Published: Tuesday, October 8, 2013, 13:40


comments powered by Disqus