Last Updated: Saturday, April 19, 2014, 15:47
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली मोबोईलवर आरामात गप्पा मारणाऱ्या लोकांसाठी आता बोलणे महागात पडणार आहे. एअरटेल, व्होडाफोन आणि रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीने आपले मोबाईल दर १० ते २० टक्क्यांनी वाढवले आहेत. गेल्यावर्षी एअरटेल, व्होडाफोन आणि रिलायन्स कम्युनिकेशन या मोबाईल कंपनीनं स्पेक्ट्रम लिलावात मोठी रक्कम मोजली होती. या गोष्टीचा फटका आता कोट्यावधी ग्राहकांना सोसावा लागणार आहे.
देशात भारती एअरटेलचे ग्राहक जास्त आहेत. एअरटेलने ३ एप्रिलपासून कंपनीचे इंटरनेट आणि कॉलदर वाढवले आहेत. व्होडाफोनने प्रमोशन पॅकवरील सवलत कमी केली आहे. पण कॉलरेट मात्र वाढवले नाही. रिलायन्स कम्युनिकेशनने २० टक्कयांनी कॉलरेट वाढवले आहेत. रिलायन्सने प्रती सेकंद कॉलरेट १.५ पैशांवरून १.६ पैसे असा वाढवला आहे. तसेच रिलायन्स २५ एप्रिलपासून हे दर लागू करणार आहे. गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच रिलायन्सने प्रीपेडवरील दर वाढवले आहेत.
येणाऱ्या काळात आयडिया, युनिनॉर, सिस्टेमा श्याम, टाटा डोकोमो या कंपनी देखील दर वाढवण्याची शक्यता आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, April 19, 2014, 14:05