भारतात मोबाईल ग्राहकांची संख्या 71 कोटी 10 लाखांवर mobile customers in india

भारतात मोबाईल ग्राहकांची संख्या 71 कोटी 10 लाखांवर

भारतात मोबाईल ग्राहकांची संख्या 71 कोटी 10 लाखांवर


www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

जीएसएम नेटवर्कवर मोबाईल ग्राहकांची संख्या फेब्रुवारी महिन्यात एक टक्क्यांनी वाढली आहे, आता ही संख्या 71 कोटी 10 लाखांवर येऊन पोहोचली आहे.

सेल्सूलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात भारती एअरटेलच्या ग्राहकांचा समावेश करण्यात आलेला नाही.

तांत्रिक कारणांमुळे भारती एअरटेलच्या ग्राहकांचा यात समावेश करण्यात आलेला नाही.

फेब्रुवारी महिन्यात आयडियाच्या ग्राहकांची संख्या 33 लाख 32 हजाराने वाढून, 13 कोटी 35 लाखांवर येऊन पोहोचली.

आयडीयाची बाजारातील भागीदारी 18.78 टक्के आहे. याच महिन्यात वोडाफोनच्या ग्राहकांची संख्या 21 लाख 55 हजारांनी वाढून 16 कोटी 43 लाख झाली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 30, 2014, 20:56


comments powered by Disqus