आता मोबाईलसोबत विमा ‘कवच’, mobile with insurance cover

आता मोबाईलसोबत विमा ‘कवच’

आता मोबाईलसोबत विमा ‘कवच’
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सध्या स्मार्टफोन्सचा जमाना आहे. तरूणवर्गाचा कल स्मार्ट फोन्सकडे अधिक दिसून येतोय. यामुळेच अधिकाधिक कंपन्या या स्मार्टफोन्सच्या बाजारात उतरत आहेत. या स्मार्टफोन्सची विक्री होण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढतायेत. याच धर्तीवर नोकियाने ग्राहकांना खूश करण्यासाठी आणि आपली मार्केटमध्ये पत टिकवण्यासाठी हॅंडसेटसोबत विमा उतरवण्याची योजना सुरु केलीय.

मोबाईलचा खप वाढवण्यासाठी नोकिया कंपनीने ‘न्यू इंडिया इंन्शुरन्स’ कंपनीसोबत एक करार केलाय. ज्यात नोकियाच्या सगळ्या फोनबरोबर विम्याची सुविधा असेल. सध्यातरी ही सुविधा फक्त पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आलीय. जर तुमचा फोन काही कारणाने हरवला, चोरी झाला अथवा काही कारणाने खराब झाला, तर वीमा कंपनी त्या मोबाईल ग्राहकाला भरपाई देईल.


कंपनीने मंगळवारी बाजारात आलेल्या लुमिया सिरीजचे नवे स्मार्टफोन लुमिया ९२०, लुमिया ८२०, लुमिया ७२० बाजारात आणले त्याचबरोबर वीमासुविधा उपलब्ध करण्याची ही माहिती दिलीय. नोकिया फोनसोबत जो विमा मिळणार आहे त्यासाठी लोकांना प्रतिवर्षी फक्त ५० रुपये द्यावे लागणार आहेत आणि विम्याची ही सुविधा नोकिया फोनच्या प्रमुख शोरूममध्ये उपलब्ध आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 12, 2013, 18:45


comments powered by Disqus