Last Updated: Thursday, March 20, 2014, 10:06
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बहुप्रतिक्षित `मोटो एक्स` भारतात लॉन्च झालाय. या फोनलाही फ्लिपकार्टद्वारे लॉन्च करण्यात आलंय.
या फोनचं वैशिष्ट्यं म्हणजे, या फोनमध्ये व्हॉईस कंट्रोलची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच, केवळ तुमच्या आवाजावर हा फोन तुम्हाला ओळखू शकेल. आवाजालाच कमांड म्हणून हा फोन वापर करेल. यामध्ये क्रिस्टल टॉक टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे खूप गर्दी आणि गोंधळ असलेल्या ठिकाणीही हा फोन तुमचा आवाज सहज ओळखू शकतो आणि काम करू शकतो.
मोटोरोला या कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार, एक्स ओके गूगल फीचर व्हॉईस डायलिंगसोबतच आवाजावरही काम करू शकेल. इतकंच नाही तर हा हँन्डसेट कर्व्ह असेल ज्यामुळे याच्या स्क्रीनवर स्क्रॅच येण्याची शक्यता कमी असेल. तसंच या फोनला सहजगत्या पॉकेटमध्ये ठेवता येऊ शकतं.
मोटो एक्समध्ये ४.७ इंचाचा एचडी स्क्रीन, १० मेगापिक्सल कॅमेरा, २ जीबी रॅम आणि ड्युएल कोअर प्रोसेसर आहे. या फोनची खासियत म्हणजे कमी प्रकाशातही हा फोन उत्तम फोटो काढू शकतो. सिंगल सिम असलेल्या या फोनमध्ये मेमरीचंही एकच ऑप्शन आहे... ते म्हणजे १६ जीबी.
`अँन्ड्रॉईड ४.४ किटकॅट` ऑपरेटींग सिस्टम यामध्ये वापरण्यात आलीय. काळा, पांढरा, रॉयल ब्लू, चेरी तसंच वूड फिनिश अशा रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. वूड फिनिश मॉ़डेलची किंमत इतरांपेक्षा थोडी जास्त असेल. `फ्लिपकार्ट`वर या फोनची किंमत आहे २३,९९९ रुपये.
मोटो एक्सचे फिचर्स - ४.६ एमोल्ड (आरजीबी) ७२० पी एच डी डिस्प्ले
- कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचा वापर
- १.७ गीगाहर्ड्ज प्रोसेसर
- २ जीबी रॅम
- क्वॉड कोअर अॅड्रेनो ३२० जीपीयू
- १० मेगापिक्सल रियर कॅमेरा
- २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 20, 2014, 07:47