Last Updated: Tuesday, May 13, 2014, 15:55
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मोटोरोला या मोबाईल कंपनीचा ‘मोटो ई’ हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आलाय. ड्युएल-सिमधारक असलेल्या या फोनची विक्री काल रात्रीपासून फ्लिपकार्टवर सुरू झालीय.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामध्ये स्क्रॅच रेसिस्टंट डिस्प्ले आहे. यामध्ये वॉटर रेसिस्टंट स्प्लॅश गार्डही आहे. यासाठी, या स्मार्टफोनच्या आत आणि बाहेरच्या बाजुनं एक नॅनो कोटिंगही करण्यात आलंय.
‘मोटो ई’मध्ये 4.3 इंचाचा हायडेफिनेशन डिस्प्ले (960 X 540 पिक्सल) आहे. यामध्ये, कॉर्निंग गोरिला ग्लासचा वापर केला गेलाय. यामध्ये 1.2 गीगाहर्टझ् ड्युएल कोअर स्नॅपड्रॅगन 200 प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे. हा गुगलच्या ऑपरेटींग सिस्टमचं अद्यावर व्हर्जन अँड्रॉईड 4.4.2 किटकॅवर काम करतो. अँड्रॉईडच्या अपडेटस् मोटोरोलामध्ये मिळतील, अशी खात्री कंपनीनं दिलीय.
यामध्ये, मागच्या बाजुनं पाच मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. पण, यामध्ये फ्रंट कॅमेरा उपलब्ध नाही. 4 जीबी इंटरनल स्टोअरेज आणि 32 जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्ड यामध्ये वापरलं जाऊ शकतं.
यामध्ये 1980 मेगाहर्टझची बॅटरी वापरण्यात आलीय. कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये थ्रीजी, वाय-फाय आणि ब्लू टूथचा समावेश आहे.
लॉन्चिंगच्या दिवशी ऑफरमध्ये या फोनच्या कव्हर केसवर 50 टक्के डिस्काऊंट दिला जाईल. ट्रान्सेंडच्या 8 जीबी मेमरी कार्डवरही 50 टक्के डिस्काऊंट आजच्या दिवशी उपलब्ध आहे. याशिवाय 1000 रुपयांपर्यंतचे ईबुक्स यावर मोफत दिले जातील. या फोनची किंमत आहे केवळ 6999 रुपये...
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 13, 2014, 15:55