Last Updated: Monday, December 30, 2013, 19:04
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीनववर्षात भारतात आणखी एक स्वस्त स्मार्टफोन येणार आहे. मोटोरोलाचा ‘मोटो जी’ हा फोन जानेवारीत भारतात लान्च होतोय. त्यामुळं भारतीय गॅझेटप्रेमींसाठी ही एक नव्या वर्षाची भेट असण्याची शक्यता आहे.
भारतात अजूनही ‘मोटो जी’च्या लाँचिंगची अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी तिकडं मलेशियामध्ये मात्र मोटो जीचं प्री लाँचिंग ऑनलाईन बुकिंग सुरू झालंय. मोटोरोला ही गूगलच्याच मालकीची कंपनी आहे. मलेशियामध्ये लाझदा डॉट कॉम या ऑनलाईन शॉपिंग साईटनं ‘मोटो जी’ची लाँचिंग पूर्व विक्री सुरू केलीय. लाँचिंग पूर्व मोटो जी खरेदी केलेल्या ग्राहकांना १३ जानेवारीनंतर हे फोन उपलब्ध होणार आहेत.
मोटोरोलानं भारत आणि ब्राझिलमध्ये ड्युएल सिम स्मार्टफोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या फोनच्या लॉन्चिंगची घोषणा मोटोरोलानं नोव्हेंबर महिन्यातच केली होती.
‘मोटो जी’चे फिचर्स साडेचार इंची स्क्रीन
७२० पिक्सेल एचडी स्क्रीन
क्वाडकोअर स्नॅपड्रॅगन ४०० प्रोसेसर
१जीबी रॅम
अँड्राईड ४.३ जेलीबिन ऑपरेटिंग सिस्टीम
५ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि १.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 30, 2013, 18:56