Last Updated: Saturday, March 29, 2014, 19:41
www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई मायक्रोसॉफ्टच्या स्काईपला एक भारतीय अॅप टक्कर देणार आहे. `आवाज` नावाचे हे अॅप वाय-फाय नेटवर्कने युझर्स फ्री कॉल करु शकतो.
स्मार्टफोनसाठी `आवाज` हे एक सामान्य प्लग इन आहे. या प्लग इनने युझर्सचे सेल्युलर नेटवर्कशिवाय कॉल कनेक्ट होईल. मात्र त्यासाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये `आवाज` प्लग इन असणे गरजचे आहे.
भारतीय माहिती तंत्रज्ञान (बीआयटी) २००३ च्या बॅचमधील विद्यार्थी अनुज जैनने `आवाज` अॅप बनवलेय. या अॅपचं डिझाईन असं करण्यात आले आहे की, ज्यामुळे सेल्युलर नेटवर्कचा वापर न करता कॉल करणे शक्य आहे. या अॅपचीखासयित म्हणजे अनुजने यामध्ये ओपस को़डॅक व्हाईस कंप्रेशन तंत्रज्ञान वापरलंय. त्यामुळे जर कोणी खासगी कॉल हॅक करण्याचा प्रयत्न केला, तर हॅकरला युझर्सचा डेटा मिळणार नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, March 29, 2014, 16:01