एमटीएनएलचा व्हिडीओ टेलिफोन, MTNL`s a video telephone

एमटीएनएलचा व्हिडीओ टेलिफोन

एमटीएनएलचा व्हिडीओ टेलिफोन
www.24taas.com, मुंबई

युवकांना आकर्षित करण्यासाठी आणि मोबाईलच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महानगर टेलिफोन निगमने (एमटीएनएल) व्हिडीओ टेलिफोनची सुविधा बाजारात आणली आहे.

एमटीएनएलच्या या सुविधेमुळे कॉल करणार्या ग्राहकांना टीव्ही किंवा प्रोजेक्शन माध्यमातून एकमेकांना पाहता येणार आहे. नुकतीच ही सेवा मुंबई आणि दिल्लीत लाँच करण्यात आली. केवळ इनकमिंगपुरते हे फोन पुनरुज्जीवित करण्यासाठी निगमने व्हिडीओ कॉलिंगचे नवे तंत्रज्ञान ग्राहकांसाठी आणले आहे.

माहिती-तंत्रज्ञान आणि दळणवळणमंत्री कपिल सिब्बल यांच्या उपस्थितीत नुकतीच ही सुविधा लाँच करण्यात आली. या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना आमि दर मिनिटाला अडीच रुपये या दराने देशभरात संपर्क साधता येणार आहे.

टेलिमेडिसिन, टेलिएज्युकेशन अशा क्षेत्रांत ही सुविधा वापरता येणार आहे. तसेच कंपन्यांना ही सुविधा वापरून मीटिंगही घेता येईल. त्यामुळे त्यांचा प्रवासखर्च, वेळ वाचणार आहे. आता एमटीएनएलचा व्हिडीओ टेलिफोनला कसा प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता आहे. मात्र, यामुळे स्पर्धा वाढणार आहे.

First Published: Monday, January 21, 2013, 10:21


comments powered by Disqus