सॉफ्टवेअर कंपनीचा फंडा, तयार केलं ‘नमो’ अँटी व्हायरस!NaMo anti-virus software to protect PCs for fre

सॉफ्टवेअर कंपनीचा फंडा, तयार केलं ‘नमो’ अँटी व्हायरस!

सॉफ्टवेअर कंपनीचा फंडा, तयार केलं ‘नमो’ अँटी व्हायरस!
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिल्लीतील इनोवेझिऑन नावाच्या आयटी कंपनीनं `नमो` नावाच्या अँटिव्हायरसची निर्मिती केली आहे. हे उत्पादन मॅलवेअर आणि व्हायरसच्या हल्ल्यांना तोंड देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा असून, पीसी वापरणाऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळं मोदींची लाट आता सॉफ्टवेअर जगतातही आली असल्याचं दिसतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्पित करण्यात आलेले ‘नमो’ हे फ्री अँटी व्हायरस सॉफ्टवेअर आता तुम्ही तुमच्या पीसीवरुन डाऊनलोड करु शकता. या अँटीव्हायरसमुळं तुमचा पीसी सुरक्षित राहण्यास मदत होईल. ‘नमो’ फीचर्सचा नरेंद्र मोदींशी काहीही संबंध नाही. तसंच त्यांनी त्याला मान्यताही दिलेली नाही.

सध्या कंपनीतर्फे `नमो`चं बेसिक व्हर्जन उपलब्ध करून देण्यात आलंय. लवकरच अॅडव्हान्स्ड व्हर्जन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे अपडेटेड व्हर्जन `अॅपल`च्या मॅक पीसींसाठी उपयुक्त असल्याचा कंपनीचा दावा आहे.

`इनोवेझिऑन `चे सीईओ अभिषेक गगनेजा म्हणाले, `या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोदी सरकारला शुभेच्छा देऊ इच्छितो.`

`नमो`ची वैशिष्ट्ये

रिअल टाइम डिटेक्शन, इंटलिजंट स्कॅनिंग, कस्टम डिटेक्शन आणि हार्ड ड्राइव्हच्या संरक्षणासाठी उपयुक्त.
एकूणच मोदी लाटेचा फायदा करून घेण्यासाठी, या अँटी व्हायरस निर्मात्यांनी ही शक्कल लढवली आहे, असंच म्हणावं लागेल. त्यामुळं आता ‘नमो’ सॉफ्टवेअर अपेक्षांची पूर्ती करते की नाही हे लवकरच कळून येईल.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 23, 2014, 20:34


comments powered by Disqus