ट्वी्टरवर `नील नितिन मुकेश`चे जोक हिट्स, neel nitin mulesh jokes popular on tweeter

ट्वीटरवर `नील नितिन मुकेश`चे जोक हिट्स

ट्वीटरवर `नील नितिन मुकेश`चे जोक हिट्स
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ट्वीटर आणि फेसबुक यूझर्सचं लक्ष आता अलोकनाथवरून अभिनेता नील नितिन मुकेशवर केंद्रीत झालं आहे. नील नितिन मुकेशचा १५ जानेवारी रोजी वाढदिवस होता, वाढदिवशी ट्वीटरवर जोक्स करून चाहत्यांनी अभिनंदन केलं, आणि ट्रेंड तयार झाला.

नील नितिन मुकेश यांच्या नावात तीन नावांचा समावेश आहे, जोक करतांना नील नितिन मुकेश म्हणजे तीन जणं समजली जातात.

ट्वीटरवर केलेले काही जोक

1. नील नितिन मुकेश जे काम करू शकतात ते काम सलमान आणि शाहरूखपण करू शकत नाही, ते काम आहे `ग्रृप डिस्कशन`

2. नील नितिन मुकेश मोटर सायकल चालवत नाहीत, कार ट्रीपल सीट असल्याने त्यांना दंड भरावा लागेल.

3. नील नितिन मुकेश यांना कोणत्याही समारंभात बोलवायचं असेल, तर त्यांना तीन आमंत्रण पत्रिका द्याव्या लागलीत.

4. जर नीव नितिश मुकेशवर कुणी निशाणा साधला आणि तो लागला नाही, तर तो म्हणेल, तीनही वाचले.

अलोकनाथ यांच्यावर सुरू झालेले हे जोक्स यापूर्वी अरविंद केजरीवाल यांच्यावरही झाले होते, त्यानंतर निरूपा राव आणि नील नितिन मुकेशपर्यंत येऊन पोहोचले आहेत.

आता पुढे कुणाचा नंबर हे ट्वीटरवर ठरणार आहे. नील नितिन मुकेशने हे जोक रिट्विट केले आहेत. सोशल मीडियावर या जोक्सचा निखळ आनंद घेतला जात आहे.

अलोकनाथेही यावर आनंद व्यक्त केला होता, कारण`सुसंस्कृत बाबुजी` अशी हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये भूमिका साकारणारे अलोकनाथ यांच्यावरही अनेक खुमासदार जोक करण्यात आले आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 19, 2014, 21:06


comments powered by Disqus