Last Updated: Thursday, May 16, 2013, 18:58
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईजर्मन ऑटोमोबाइल्समधील मर्सिडिज कंपनीच्या मर्सिडिज- बेंझने गुरूवारी नवी कोरी लक्झरी एसयुव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल) कार लाँच केली आहे. या कारची किंमत भारतात ७७ लाख रुपये आहे.
टेनिस स्टार बोरिस बेकरने या कारचं उद्घाटन केलं. या कारचं नाव जी-क्लास असून सध्या त्याची केवळ १०० युनिट्स उपलब्ध करण्यात आली आहेत. पुण्याजवळील चाकण प्लंटमध्ये या कारची निर्मिती होत आहे. सध्या या कारची किंमत २२ लाख रुपये आहे. मात्र यामध्ये इतर सुधारणा करून सप्टेंबरपर्यंत ही कार मोठ्या प्रमाणात जागतिक बाजारपेठेत उतरणार आहे.
या कारची इंजिन कपॅसिटी ३ लिटर पेट्रोल आणि २.५ लिटर डिझेल एवढी आहे. अमेरिकेखालोखाल भारताची बाजारपेठ मर्सिडिजसाठी महत्वाची मानली जात आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, May 16, 2013, 18:58