Last Updated: Monday, October 15, 2012, 18:28
www.24taas.com, नवी दिल्ली मारूती सुझुकीची छोटी कार बाजारात येण्याची आता प्रतिक्षा संपली आहे. १६ ऑक्टोबर रोजी मारूती सुझुकी ऑल्टोचे ८०० सीसीचे नवीन मॉडेल बाजारात दाखल होणार आहे. या गाडीचे ५,०००रूपयांमध्ये बुकींग सुरू झाले आहे. ही कार नॅनोला टक्कर देईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. ही कार डिझेल-पेट्रोल आणि गॅसवर असणार आहे.
ऑल्टो-८०० ही नवीन कारमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याआधीच्या मॉडेलपेक्षा एक उत्तर कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या कारची किमत २ ते २.५ लाख किंतम आहे. नवी कार सहा मॉडेलमध्ये उपलब्ध असणार आहे . पेट्रोलवरील कारचे मायलेज प्रति लिटर २३ किलोमीटर असणार आहे. तर सीएनजीवर चालणारी कार ३१ किमी मायलेज देईल.
अंतरर्गत रचना फॅनशेबल आणि ट्रेंडी आणि स्टायलिश असणार आहे. पेट्रोलवरील कारची किंमत २.५ ते ३ लाख दरम्यान आहे. तर सीएनजीवरील कारची किंमत ३ ते ३.५ लाखाच्या घरात असणार आहे.
First Published: Tuesday, October 9, 2012, 16:40