Last Updated: Tuesday, September 18, 2012, 22:18
www.24taas.com, वॉशिंग्टन अॅपलची निर्मिती असलेला आयफोन ५ नुकताच लॉन्च करण्यात आलाय. या फोनच्या लॉन्चिंगच्या पहिल्याच दिवशी तब्बल २० लाख फोन्सची ऑर्डर अॅपलला मिळालीय. ही संख्या गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च झालेल्या आयफोन ४ पेक्षा तिप्पट आहे.
स्मार्टफोनच्या यादीत सध्या पहिला क्रमांक पटकावणारा आयफोन ५नं लोकांमध्ये एक क्रेझच निर्माण केलीय. सगळ्यात जास्त तेजीत विकणारं पहिला फोन म्हणून आयफोन ५नं आपला एक रेकॉर्ड कायम केलाय. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयफोन ५ नं आयफोन ४ चाही सर्वात जास्त ऑर्डर्सचा रेकॉर्ड तोडत एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. ग्राहकांनी दिलेला प्रतिसाद अद्भूत असल्यांचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळेच आयफोन हा आत्तापर्यंतचा सर्वात सुंदर आणि श्रेष्ठ फोन असल्याचा समज आता दृढ होताना दिसतोय.
२८ सप्टेंबर रोजी हा फोन न्यूझीलंड, डेन्मार्क, बेल्जियम, फिनलॅंड, चेक गणराज्य, ऑस्ट्रीया, हंगेरी, आयर्लंड, इटली, नॉर्वेसहित अन्य २२ देशांत लॉन्च होणार आहे.
First Published: Tuesday, September 18, 2012, 22:18