Last Updated: Thursday, November 1, 2012, 08:50
www.24taas.com, मुंबईटायटन या घड्याळ्याच्या लोकप्रिय ब्रँण्डनं `रागा सिटी` ही नवी रेंज लॉन्च केलीये. बॉलीवुड अभिनेत्री नर्गीस फक्री आणि टायटनचे व्हाईस प्रेसीडेंट अजय चावला यांच्या हस्ते या नवीन रेंजचं उदघाटन करण्यात आलं.
खास महिलांसाठी बनवण्यात आलेल्या प्रकारांमध्ये पॅरीस आणि रोमांस ही थीम ठेवण्यात आलीये. पॅरीसमधील महत्वाच्या ठिकाणांनुसार केलेली घड्याळ्याची डिझाईन्स हे या टायटनच्या नवीन प्रकारांचं वैशिष्ट्य आहे. `टायटन रागा सिटी` लेडीजसाठी डिझाइन केलं आहे.
डिझाइननुसार या घडळ्यांच्या किमतीही वेगवेगळ्या आहेत. 2 हजार ते 11 हजार रुपयांपर्यंत या श्रेणीतील घड्याळं उपलब्ध आहेत.
First Published: Thursday, November 1, 2012, 08:50