Last Updated: Saturday, April 26, 2014, 16:13
www.24taas.com, झी मीडिया, लंडन स्वत:च स्वताची सफाई करुन घेणारी एक नवीन कार जापानची कार कंपनी `निसान`ने तयार केली आहे. अता तूम्ही कितीही लांबचा प्रवास करुन आला असलात तरी गाडी धूण्याची काळची आता विसरा.
निसान कंपनीने या गाडीची वैशिष्ठे सांगताना सांगीतलं की, ही गाडी आपली स्वच्छता स्वत: करते. त्याच प्रमाणे `नैनो-पेंट टेक्नोलॉजी`च्या सहाय्याने धूळ देखील साफ करते. तसेच `सुपर-हाइड्रोफोबिक` आणि `ओलिओफोबिक` हे पाणी आणि तेलाचे डाग देखील साफ करते.
कंपनीच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले की, `नैनो-पेंट टेक्नोलॉजी`चा वापर करणारी निसान ही पहिलीच कंपनी आहे. जर का कोणी `अल्ट्रा इवर ड्राई` टेक्नोलॉजीचा वापर करण्यास उत्सूक असेल तर त्यांना ४५,००० रुपये जास्त द्यावे लागतील.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, April 26, 2014, 15:58