बहिष्कार मागे; बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, No more trouble to HSC students

बहिष्कार मागे; बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

बहिष्कार मागे; बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
www.24taas.com, मुंबई

विविध मागण्यांसाठी खाजगी शिक्षण संस्थांनी 12 वीच्या परीक्षेवर टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळं दोन दिवसांवर परीक्षा आलेल्या 12 वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारचा सकारात्मक प्रतिसाद पाहता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हा बहिष्कार मागे घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटील दिली आहे. तर त्यांच्या या निर्णयाचं शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी स्वागत केलंय.

बारावीची परीक्षा अवघ्या दोन दिवसांवर आली असताना तिढा कायम होता. खाजगी शिक्षण संस्थांनी या परीक्षांवरचा बहिष्कार घातला होता. त्याचा जवळपास तीन हजार परीक्षा केंद्रांवर परिणाम झाला असता. आज खाजगी शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्य़ांबरोबर बैठक झाली होती. प्रथम या बैठकीत कुठलाही तोडगा निघालेला नव्हता.

First Published: Monday, February 18, 2013, 22:39


comments powered by Disqus