Last Updated: Wednesday, April 10, 2013, 16:58
www.24taas.com, हैदराबादकेंद्र सरकारने मार्च महिन्यात बजेट मांडताना मोबाईलच्या किंमतीत वाढ होईल, असे स्पष्ट केले. असे असताना नोकिया या मोबाईल बनविणाऱ्या कंपनीने सर्वात स्वस्त रंगीत मोबाईल बाजारात आणला आहे.
नोकिया कंपनीने भारतातील ग्राहकांसाठी स्वस्त मोबाईल मंगळवारी बाजारात आणला. `नोकिया१०५` या हॅंडसेटची किंमत केवळ १२४९ रूपये असणार आहे. हा नोकियाचा सर्वात कमी किंमतीचा मोबाईल आहे.
नोकियाने प्रथमच भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कलर हॅंडसेट १२४९ एवढ्या कमी किमतीत भारतात आणला आहे. भारतात या हॅंडसेटची सर्वाधिक विक्री होईल, असा कंपनीला विश्वास नोकियाचे दक्षिण विभागाचे व्यवस्थापक टी. एस. श्रीधर यांनी व्यक्त केलाय.
या मोबाईल हॅंडसेटमध्ये एफएम रेडिओ, स्पिकिंग क्लॉसक आणि फ्लॅशलाईट आहे. रंगीन दुनियेत भारतीय बाजारातील ब्लॅक अँड व्हाइट मोबाईल हॅंडसेटचे अस्तित्व संपण्याची शक्यता आहे.
First Published: Wednesday, April 10, 2013, 16:58