नोकियाचं ‘सिंबायन पर्व’ अखेर संपलं!, Nokia officially ends ‘Symbian era’

नोकियाचं ‘सिंबायन पर्व’ अखेर संपलं!

नोकियाचं ‘सिंबायन पर्व’ अखेर संपलं!
www.24taas.com, लंडन

सध्या विविध अडचणींतून मार्ग काढत प्रवास करणारी मोबाईल कंपनी नोकियानं लवकरच आपलं ‘सिंबायन पर्व’ संपुष्टात येणार असल्याची घोषणा केलीय. गेल्या अनेक वर्षांपासून नोकियानं आपले ‘सिंबायन ऑपरेटींग सिस्टम’वर आधारित असणारे अनेक मोबाईल लॉन्च केलेत.

नोकियानं नुकताच ‘८०८ प्युअरव्ह्यू’ हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. सिंबायन ऑपरेटींग सिस्टमवर आधारित असलेला ‘८०८ प्युअरव्ह्यू’ हा आपला शेवटचा मोबाईल असेल, अशी औपचारिक घोषणा फिनलँडची कंपनी नोकियानं केलीय. २०१२ हे वर्ष सिंबायन टेक्नॉलॉजीसाठी महत्त्वाचं आणि शेवटचं वर्ष ठरलं.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत नोकियाचे या ऑपरेटींग सिस्टमवर आधारित असलेले २.२ लाख मोबाईल फक्त २०१२ च्या चतुर्थांश पर्वात विकले गेलेत. याच काळात ल्युमियाचे ४.४ लाख फोन विकले गेलेत.

विकल्या गेलेल्या सगळ्या म्हणजे १५.९ लाख स्मार्टफोनमध्ये १४ टक्क्यांहून कमी मोबाईल ‘सिंबायन’वर आधारित होते. मार्केटवर अँन्ड्रॉईडनं ताबा मिळवण्याआधी 'सिंबायन' ही सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी ऑपरेटींग सिस्टम ठरली होती. १९९८ पासून अस्तित्वात असलेली सिंबायन प्रणाली नोकिया, एरिक्सन, मोटोरोला यासांरख्या कंपन्यांमध्ये वापरली गेली. २००८ साली या प्रणालीवर नोकियानं संपूर्ण वर्चस्व मिळवलं होतं.

First Published: Friday, January 25, 2013, 17:36


comments powered by Disqus