Last Updated: Monday, March 10, 2014, 17:23
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमोबाईल कंपनी नोकियाने भारतीय बाजारात आपला पहिला एंड्रॉयड फोन लॉन्च केला आहे. या फोनची किंमत दहा हजारांपेक्षा कमी आहे.
या फोनची किंमत काय असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर नोकियाच्या पहिल्या एँड्रॉयड फोनची किंमत ८ हजार ५९९ रूपये ठेवण्यात आली आहे.
या फोनची स्क्रीन ४ इंच आहे, डब्लूवीजीए टच डिस्प्ले स्क्रीन आहे, या फोनमध्ये दोन सीम वापरता येतील, सर्वात महत्वाचं म्हणजे या नोकियाचा पहिला एंड्रॉयड स्मार्टफोन आहे आणि फार कमी किमतीत नोकियाला बाजारात उतरवण्यात आलं आहे.
यात 1.5 गिगाहर्टझचा स्पीड देणारा स्नॅपड्रॅगन एस ४ प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 512 एमबी रॅम्प आणि ४ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.
बेस्ट क्वालिटी पिक्चर्स आणि व्हिडीओसाठी यात ३ मेगापिक्सेल कॅमेराही देण्यात आला आहे. जास्त काळ चालणारी 1500 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
नोकिया एक्स स्मार्टफोन सियान, येलो, ग्रीन, व्हाइट, रेड तसेच ब्लॅक या सहा रंगात उपलब्ध आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 10, 2014, 15:31