नोकियाच्या नव्या एंड्राईड फोनचं नाव लीक, nokias new android phone coming soon

नोकियाच्या नव्या एंड्राईड फोनचं नाव लीक

नोकियाच्या नव्या एंड्राईड फोनचं नाव लीक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सध्या फिनलँडच्या मालकीच्या असलेली नोकिया कंपनी लवकरच आपला एंड्राईड फोन बाजारात आणणार आहे. या फोनची सर्वांना उत्सुकता लागून आहे.

ट्वीटरवरील @evleaks या अकाऊंटवर या फोनचे प्रेस शॉटस लीक करण्यात आले आहेत. या फोनला नोकिया एक्स नाव देण्यात आलं आहे.

हा फोन बार्सिलोनाच्या मोबाईल काँग्रेसमध्ये लाँच करण्यात येणार आहे. प्रेस नोटमध्ये नोकियाला हिरव्या रंगात दाखवण्यात आलं आहे.

मात्र नंतर हा हिरवा रंग काढून टाकण्यात आला होता. या फोनचा इंटरफेसही विंडोज फोनसारखाच आहे.

मात्र या फोनवर गुगलच्या स्टोअर मिळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. या बदल्यात नोकियाने अपान ऐप्प स्टोर जोडलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

या फोनला स्क्रीन ४ इंचाची आहे, तसेच १.२ जीएचझेड डुअल कोर स्नॅपड्रॅगन २०० प्रोसेसर देण्यात आलंय. पाच मेगा पिक्सेल कॅमेऱ्यासह ५१२ एमबीची रॅम्प असेल.

नोकिया एक्समध्ये ब्लूटूथ ४.० आणि एंड्रॉईड ४.४ किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम आहे. या ड्युअल सिम स्मार्टफोन आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 19, 2014, 13:28


comments powered by Disqus