Last Updated: Wednesday, July 17, 2013, 15:47
www.24taas.com,झी मीडिया,मुंबईफेसबुक म्हणजे युथची एक प्रकारची ओळखच... फेसबूकच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगला नव्या प्रकारे ओळख मिळाली. परंतु वाढते गुन्हे लक्षात घेता या सर्वांसाठी फेसबुकला जबाबदार ठरवण्यात येतंयं.
तरुण पिढी चुकीच्या मार्गाकडे वळतेय याचा ठपका फेसबुकवर ठेवला जातोय. म्हणूनच फेसबुकनं आता साक्षरता मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. फेसबुक आता इंटरनेटच्या वापराबद्दल धडे देणार आहे. फेसबुकच्या माध्यमातून १३ ते १६ वयोगटाच्या तरुणांना ‘इंटरनेट साक्षर’ करण्यात येणार आहे.
‘इंटरनेट सेफ्टी एज्युकेशन’ हा आगळावेगळा कार्यक्रम राबविण्यासाठी ‘इंटरनेट अॅन्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया’ने फेसबुकशी करार केलाय. यात मुले, शिक्षक, पालक यांनी इंटरनेटचा वापर कसा करावा, कोणती सावधानता बाळगावी यासर्वांचे धडे दिले जाणार आहेत. इंटरनेटचा विधायक वापर कसा करावा हे शिकवले जाणार आहे. या मोहिमेत शैक्षणिक संस्था, मुलांच्या सुरक्षेसंदर्भात काम करणाऱ्या संस्था यांचा समावेश होणार आहे. ही मोहिम टप्प्या-टप्प्यात चालवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि हैदराबाद येथील ३० शाळा आणि संस्थातील १८ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
फेसबुकने हे सारे प्रशिक्षण साहित्य सॉफ्टवेअरद्वारे विकसित केलंय आणि महत्त्वाचं म्हणजे हे प्रशिक्षण सर्व भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. सर्व प्रेझेंटेशन्स आणि इव्हेंटस् http://www.facebook.com/Facebookindia या लिंकवर ऑनलाइनही पाहता येतील.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 17, 2013, 15:28