आता रोबोट तुमच्याशी भांडणारसुद्धा!Now robot can replace human debate

आता रोबोट तुमच्याशी भांडणारसुद्धा!

आता रोबोट तुमच्याशी भांडणारसुद्धा!
www.24taas.com, लंडन

विज्ञान युगात दर दिवसाला काही ना काही तरी प्रयोग केले जातात. असाच एक नवीन प्रयोग यंत्रमानवार करण्यात येत आहे. लवकरच एका वेगळ्या प्रकारचा रोबोट लोकांच्या सेवेत हजर होणार आहे.

संशोधकांकडून असा दावा करण्यात आला आहे की येत्या तीन वर्षात असे संगणक आणि यंत्रमानव लोकांसमोर आणले जातील, की जे माणसांसोबत गप्पा मारू शकतील आणि वादविवाद करू शकतील. संशोधक असे काही प्रयोग करत आहेत, की मानव आणि यंत्रमानव यांच्यात वादविवाद ही घडण्याची शक्यता आहे.

“यंत्रमानवांच्या तंत्रज्ञानावर मनुष्यांचा विश्वास वाढवण्याठी हा प्रयोग केला जात आहे”, असं डॉ.वॉम्बटर वॉस्कोनसेलोस यांनी सांगितले. हे सॉफ्टवेअर येत्या तीन वर्षात प्रदर्शित केलं जाईल. या सॉफ्टवेअरमुळे मनुष्यप्राणी स्वावलंबी होईल, कारण आता तो आपल्या चुकांचं खापर तो रोबोट्स आणि कॉम्प्युटरवर फोडू शकणार नाही.

First Published: Sunday, September 16, 2012, 17:32


comments powered by Disqus