Last Updated: Monday, April 29, 2013, 17:21
www.24taas.com, आग्रास्मार्टफोनमधील ऑटोसिंक या ऑप्शनमुळे एका दाम्पत्याची बेआब्रु झाली असून आता त्याचं लग्न मोडण्याच्या बेतात आहे. हे विचित्र वाटत असलं, तरी खरं आहे. आग्र्यामधील नवविवाहीत जोडप्यावर ही वेळ आली आहे आणि याला कारण आहे स्मार्टफोन आणि फेसबुक
आग्र्यातील एका तरुण व्यापारी लग्नानंतर आपल्या पत्नीसोबत हनीमूनला परदेशी गेला होता. तेथे त्याने बेडरूममध्ये आपल्या पत्नीचे काही खासगी फोटो काढले. यासाठी त्याने आपल्या स्मार्टफोनमधील कॅमेराचा वापर केला होता. मात्र काही दिवसांनी स्मार्टफोनवरून फेसबुकवर लॉग इन केलं असता पत्नीचे ‘ते’ अश्लील फोटो ऑटोसिंकमुळे आपोआप फेसबुकवर लोड झाले. या फोटोंबद्दल त्याला आणि त्याच्या पत्नीला लोकांचे कॉल येऊ लागल्यावर हा प्रकार लक्षात आला.
आपले फोटो जाणून बुजून नवऱ्याने फेसबुकवर टाकल्याचा पत्नीचा समज झाला आणि तिने थेट पोलीस ठाणं गाठलं. सायबर क्राइम टीमने सर्व फोटो डीलीट केले. ही घटना अभावितपणे घडली असल्याचा निर्वाळा झाल्यावर पत्नीने आपली नवऱ्याविरुद्ध असलेली तक्रार मागे घेतली.
First Published: Monday, April 29, 2013, 17:21