Last Updated: Wednesday, May 14, 2014, 20:27
www.24taas.com, झी मीडिया, कुरूक्षेत्रआपल्या परिस्थिती पुढे न झुकणाऱ्या एका तरूणाने सर्वोत्तम संधी मिळवली आहे. हरियाणाच्या कुरूक्षेत्र भागातील नीमवाला गावच्या वीरेंद्र रायका याला सॉफ्टेवअर कंपनीने ५ कोटी रूपयांचं वार्षिक पॅकेज देण्याची ऑफर केली आहे.
वीरेंद्रने इग्नूमधून बी टेक केलं आहे. वीरेंद्रवा आयआयटीमधून शिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र गरिबामुळे वीरेंद्रला आयआयटीत प्रवेश घेण्यात यश मिळालं नाही. वीरेंद्रने एंटी हॅकिंग सॉफ्टवेअर बनवलं आहे.
मायक्रोसॉफ्टचे सिनियर व्हाईस प्रेसिंडेंट पीटर केलीन यांनी वीरेंद्रला ऑफर लेटर दिलंय, यात ज्वायनिंगसाठी ४ डिसेंबरपर्यंतची वेळ दिली आहे.
गरीबी आडवी आली पण इन्गूमधून शिक्षण पूर्ण केलं
वीरेंद्रने २०१० मध्ये आयआयटीसाठी निवडला गेला होता, मात्र घराची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्याला आपलं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. वीरेंद्रने 2011 साली इग्नूसाठी प्रवेश घेतला आणि ट्यूशन घेऊन आपल्या शिक्षणाचा खर्च पूर्ण केला.
मायक्रोसॉफ्टने वीरेंद्रला डिसेंबर २०१३ साली 1.12 कोटी रूपयांचं पॅकेज ऑफर केलं, पण वीरेंद्रने ही ऑफर स्वीकारली नाही. नंतर 2014 मध्ये याचं कंपनीने ही ऑफर 4.85 कोटीची केली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 14, 2014, 20:27