Last Updated: Thursday, December 12, 2013, 19:23
www.24taas.com, झी मीडिया, पुणेसोशल मीडिया आणि मोबाईल अॅलप्स खूप लोकप्रिय होत आहे, पण यामाध्यमातून काही गुन्हेही होत असल्याचे दिसून येत आहे. आता `व्हॉट्स अॅ प` या मोबाईल अॅुप्लीकेशनवर संवेदनशील माहिती टाकल्यास संबंधितावर व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा पुणे पोलिसांनी दिल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
तंत्रज्ञानात वाढ होत असताना त्याचे जसे फायदे आहे तसे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, पोलिसांकडून `व्हॉट्स अॅप`वर या अॅप्लिकेशवर करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.
मोबाईल, ई-मेल्स आणि सोशल मीडियाच्या इतर माध्यमांतून लोकांची होणारी फसवणूक वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या तरूणांमध्ये लोकप्रिय असलेले `व्हॉट्स अॅकप` या अॅनप्लिकेशनवरून संवदेनशील आणि कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणणारी माहिती अपलोड होत असल्याने असे करणा-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असे पुणे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 12, 2013, 19:19