बारावीचे निकाल लागणार ५ जूनपूर्वीच! Results of 12th standard will declare before 5th June

बारावीचे निकाल लागणार ५ जूनपूर्वीच!

बारावीचे निकाल लागणार ५ जूनपूर्वीच!
www.24taas.com, मुंबई

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई आणि आयसीएसई परीक्षांचे निकाल ५ जूनपूर्वीच जाहीर होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागातील सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.

राज्यातल्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल साधारणतः जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागतात. एचएससी, सीबीएसई, आयसीएसईचे निकालसर्वांचेच निकाल या सुमारास लागतात. मात्र बारावीनंतर महाराष्ट्राबाहेर किंवा परदेशातील युनिव्हर्सिटींमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांचं मात्र यात नुकसान होतं.

यामुळेच महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा घेणारी मंडळां जूनच्या पहिल्याच आठवड्यात ५ तारखेपर्यंत निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टळू शकेल.राज्यभरात आयसीएसईच्या सुमारे १६० माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत. आयएससीच्या १३० तर सीबीएससीच्या ४०० शाळा आहेत.

First Published: Wednesday, January 2, 2013, 16:38


comments powered by Disqus