रोमिंग फ्री इंडिया!, ROAMING FREE INDIA

रोमिंग फ्री इंडिया!

रोमिंग फ्री इंडिया!
www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली

मोबाईल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खासगी कंपन्या विविध योजना सुरू करण्यावर भर देत आहेत. मात्र, या कंपन्या छुप्प्या मार्गाने पैसे वसूल करतात, ही बाब वेगळी. आता तर खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी देशातील सर्वात मोठी सार्वजिनक टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सज्ज झालेय. या कंपनीने रोमिंग फ्री इंडियाची घोषणा केलेय.

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएल राष्ट्रीय रोमिंगसाठी एक विशेष योजना आणतेय.या योजनेअंतर्गत बीएसएनएल ग्राहकांना देशांतर्गत रोमिंगमध्ये इमकमिंग कॉल फ्री असतील. त्याचप्रमाणे आऊटगोईंग कॉलचे दरही कमी ठेवण्यात येणार आहे.

बीएसएनएलच्या रोमिंगसाठी दोन विशेष टॅरिफ व्हाऊचर सादर करण्यात आलेत. त्यामध्ये ग्राहक दिवसाला ५ रु आणि ३० दिवसांसाठी ६९ रुपये भरुन अमर्याद इनकमिंग कॉलचा लाभ घेऊ शकतात. आऊटगोईंग कॉल तसेच राष्ट्रीय कॉलचा दर १.५ पैसे प्रति सेकंद ठेवला जाईल, या व्यतिरिक्त पोस्टपेड ग्राहकांसाठीही दोन विशेष रोमिंग शुल्क योजना सुरु केल्यात. या आधी एयरटेल, आयडिया यांसारख्या कंपन्यांनीही या सेवा सुरु केल्या होत्या.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, July 12, 2013, 13:07


comments powered by Disqus