Last Updated: Friday, October 12, 2012, 10:55
www.24taas.com, मुंबई टू व्हिलरच्या दुनियेत ‘प्रेस्टिजिअस’ म्हणून समजल्या जाणाऱ्या `रॉयल एनफिल्ड`नं आता 'थंडरबर्ड ५००' ही नवी बुलेट लॉन्च केलीय. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना मात्र चांगलीच थंडी भरलीय.
‘रॉयल एनफिल्ड’ कंपनीनं गुरुवारी आपली 'थंडरबर्ड ५००' लॉन्च केलीय. मोटारबाईक्सच्या राईडचा पुरेपूर अनुभव घेणाऱ्यांना ही बुलेट नक्कीच तृप्त करेल, अशी आशा कंपनीनं व्यक्त केलीय. रायडर आणि मोटारबाईकच्या सुरक्षेसाठी या बाईकमध्ये अतिरिक्त व्यवस्था करण्यात आलीय. ५०० सीसी यूनिट कंस्ट्रक्शन इंजनचा वापर केल्यामुळे रफ रोडवरही ही बुलेट चालवायला धम्माल येईल, यात शंकाच नाही.
आयशर मोटर्सचे सीईओ सिद्धार्थ लाल यांच्या म्हणण्यानुसार, `रॉयल एनफिल्डच्या ग्राहकांमध्ये ‘थंडरबर्ड’साठी एक वेगळीच क्रेझ आहे. एका सन्मानानं या बुलेटकडे पाहिलं जातं आणि या बुलेट राईडचा एक वेगळाच आनंद घेण्यासाठी मोठ्या मौजेने रायडर्स यावर सवारी करतात` रॉयल एनफिल्ड आयशर मोटर्सचा एक भाग आहे.
५०० सीसीची ही बुलेट काळ्या रंगाच्या तीन वेगवेगळ्या शेडसमध्ये उपलब्ध आहे. यामधला ‘ब्लॅक विथ मॅट फिनिश’ची बुलेट सगळ्यांच्याच पसंतीस पात्र ठरलीय. मुंबईमध्ये या बाईकची ऑन रोड किंमत आहे १ लाख ८२ हजार ५७१ रुपये.
First Published: Friday, October 12, 2012, 10:52