अबब... फेसबुकवर सचिनपाठी इतके सारे फॅन्स..?, Sachin facebook fan page

अबब... फेसबुकवर सचिनपाठी इतके सारे फॅन्स..?

अबब... फेसबुकवर सचिनपाठी इतके सारे फॅन्स..?
www.24taas.com, मसुरी

वनडे क्रिकेटला नुकताच अलविदा केलेला मास्टर ब्लास्टर आपल्या रिटायरमेंट सचिन अजूनही मनाने भारतीय टीम सोबतच असल्याचे सांगतो. आपल्या २३वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात चाहत्यांनी दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी त्यानं चाहत्यांचे आभार मानले.

सचिन वन-डे क्रिकेटमधून जरी रिटायर झाला असला तरीही त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही... फेसबुकवर सचिनचे ऑफिशअल फॅन पेज आहे. या फॅन पेजच्या लाईक्सची संख्या तब्बल ८९ लाख इतकी आहे. त्यामुळे सचिनचा चाहता वर्ग अजूनही फार मोठ्या प्रमाणात त्याला फॉलो करतो आहे.

सचिन सध्या कुंटुंबासोबत मसुरीला सुट्टी घालवितो आहे. त्याने या सुट्टीत काढलेले काही फोटो त्याच्या या फॅनपेज वर अपलोड करण्यात आले आहेत. त्याच्या एका फोटोला तब्बल अडीच लाख लोकांनी लाईक केलं आहे. तर जवळजवळ १६ हजार लोकांनी त्या फोटोवर कमेंट केली आहे. त्यामुळे सचिनची फेसबुकवर चांगलीच चलती आहे.

First Published: Thursday, January 3, 2013, 13:28


comments powered by Disqus