सुरक्षेची धास्ती?... `सेफ्टी पिन` आहे ना!, safety pin, mobile application for women safety

सुरक्षेची धास्ती?... `सेफ्टी पिन` आहे ना!

सुरक्षेची धास्ती?... `सेफ्टी पिन` आहे ना!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सेफ्टी पिन... प्रत्येक महिलेकडे हमखास आढळणारी गोष्ट... होय ना! पण, आता याच संकल्पनेतून तयार झालंय एक मोबाईल अॅप्लिकेशन...

महिलांच्या सुरक्षेकरता हे एक नवीन मोबाईल अॅप्लिकेशन बनविण्यात आलंय. तुमच्या मोबाईलवर इंटरनेटची सुविधा असेल तर तुम्हीही हे अॅप्लिकेशन वापरू शकता. जीपीएस, थ्री जी आणि वायफायसारख्या सुविधा असलेल्या अँड्रॉईड मोबाईलवर हे अॅप्लिकेशन वापरता येतं.

मुंबई-पुणे-दिल्ली यांसारख्या शहरांत रात्री-अपरात्रीपर्यंत कामानिमित्तानं घराबाहेर राहणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. पण, या महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सतत त्यांच्या सुरक्षेची काळजी सतावत असते. अशा वेळी वाईट घटनांना आळा घालण्याकरिता सुरक्षेचा उपाय म्हणून महिलांकरिता ‘सेफ्टी पिन’ या नावानं हे मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात आलंय.

मुंबईतील एका महिलेने आपल्या परिसरातील पथदिवे बंद असल्याबाबतची माहिती या अॅप्लिकेशनवर टाकली होती. त्यासोबतच रात्रीच्या वेळी भयाण वाटणाऱ्या या परिसराचा फोटोही त्यावर अपलोड केला. त्यानंतर काही वेळात शेजारच्या काही जणांनीदेखील या छायाचित्रावर प्रतिक्रिया दिली. त्यावर चर्चा सुरू झाली आणि सर्वांनी मिळून त्या संदर्भात तक्रार केल्यानंतर लगेचच पथदिवे सुरू करण्यात आले. अशा स्वरूपाचे अनेक अनुभवदेखील या ठिकाणी शेअर केलेले आहेत.

स्मार्टफोनसारख्या आधुनिक सुविधांचा वापर आपल्या सुरक्षेसाठी करण्याचा हा फंडा चांगलाच लोकप्रिय ठरतोय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, November 28, 2013, 15:56


comments powered by Disqus