सॅमसंग S4 किंमत १० हजारांनी घरसली? samasung S4 buyback offer

सॅमसंग S4 किंमत १० हजारांनी घरसली?

सॅमसंग S4 किंमत १० हजारांनी घरसली?
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

सॅमसंग गॅलेक्सी S4ची किंमत10 हजार रुपयांनी कमी करण्यात आलीय. ही बायबॅक ऑफर आहे. भारतात आता सॅमसंग गॅलेक्सीच्या फोनची किंमत ३० हजारांवर येऊन पोहोचलीय.

सॅमसंग गॅलेक्सी s5 हा फोन बाजारात काही दिवसांपूर्वीच दाखल झाला आहे, यानंतर सॅमसंग s4 ची किंमत घसरली असल्याचं सांगण्यात येतंय.


इंटरनेटवरून या फोनची खरेदी केली, तर हा फोन २९ हजार ३०० रूपयांपर्यंत खरेदी करता येतो. गॅलेक्सी S4 भारतात लॉन्च झाला तेव्हा, या फोनची किंमत ४१ हजार ७०० रूपये होती.

Flipkart, Snapdeal आणि Amazon.in या ऑनलाईन साइट्सवर या फोनची आपल्याला ३० हजाराच्या आत खरेदी करता येणार आहे.

सॅमसंगने s4 स्मार्टफोनची किंमत कमी करण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सॅमसंगने ही बायबॅक ऑफर दिली आहे, यात दहा हजार रूपये वजा होणार असल्याचं सॅमसंगने म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 2, 2014, 21:04


comments powered by Disqus