Last Updated: Monday, January 6, 2014, 13:13
www.24taas.com, झी मीडीया, मुंबई स्मार्टफोन जगतात सॅमसंग गॅलेक्सी S-5 आणण्याच्या तयारीत आहे. सॅमसंगकडून गॅलेक्सी S-5 हा फेबु्वारी महिन्यात लॉन्च होणार आहे.
कोरियन मीडियात आलेल्या माहितीनुसार हा फोन स्पेनमध्ये लॉन्च करण्यात येईल. सॅमसंगचा गॅलक्सी S-5 एक वेगळ्या दर्जाचं हार्डवेअर वापरल्याचा दावा सॅमसंगचा आहे.
सॅमसंगचा हा फोन जरा वेगळा असणार आहे, यात फोनचा डिस्प्ले आणि फीचर्स अनोखे असणार आहेत. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष डॉन हग यांनी ही माहिती दिली.
नववर्षानिमित्त झालेल्या पार्टीतगॅलेक्सी S-5 लवकरच लॉन्च होणार असल्याची घोषणा करण्यात आली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, January 6, 2014, 13:13