Last Updated: Thursday, March 27, 2014, 12:23
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसॅमसंगचा नेक्स्ट जनरेशनचा स्मार्टफोन गॅलेक्सी एस -५ आज भारतात लॉन्च होणार आहे. सॅमसंगचा हा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन असणार आहे. नजरेच्या कटाक्षाने सुरू होणारा हा स्मार्टफोन एप्रिलमध्ये लाँच होईल. तो ११एप्रिलपासून जगभरात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
सॅमसंगचा हा स्मार्टफोन हवा, पाणी यापासून सुरक्षित असेल. सध्या तो अमेरिका आणि स्वित्झर्लंडमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. याच्या १६ जीबी व्हर्जनची किंमत जवळपास ५० हजार रुपये आहे. अॅपल आयफोन ५ तसंच एलजी जी-२ च्या तोडीचा आहे. हा फोन आज भारतात लाँच होणार असून तो जगभरातील ५९ देशांमध्ये उपलब्ध होईल. यात प्रामुख्याने ब्राझील, चीन, जर्मनी आणि युकेचा समावेश आहे.
- सॅमसंग गॅलेक्सी एस -५ हा खास मटेरियलपासून बनवण्यात आला आहे.
- फोनचा डिसप्ले फ्लेक्सिबल असू शकतो.
- ५.१ इंच फूल एचडी डिसप्ले स्क्रीन
- १६ मेगापिक्सेल रिअर तसंच २ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- फिंगर स्कॅनर आणि बायोमॅट्रिक स्क्रीन लॉकिंग हे वैशिष्ट्य
- या स्मार्टफोनमध्ये किटकॅट ४.४.२लेटेस्ट अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम
- कंपनीने या फोनमध्ये २ जीबी रॅम
- बॅटरी २८०० एमएएचची असून ती २१ तास टॉकटाईम देते.
- हा फोन १६जीबी, ३२ जीबी, ६४ जीबी या व्हर्जनमध्ये उपलब्ध
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 27, 2014, 12:17