`सॅमसंग गॅलॅक्सी एस 4` ची किंमत झाली कमी! Samsung galaxy S4 price decreases

`सॅमसंग गॅलॅक्सी एस 4` ची किंमत झाली कमी!

`सॅमसंग गॅलॅक्सी एस 4` ची किंमत झाली कमी!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मोबाइलप्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत दाखल झालेला सॅमसंग गॅलॅक्सी एस 4 या मोबाइलची किंमत कमी करण्याचा निर्णय सॅमसंगने घेतला आहे.

भारतात सॅमसंग गॅलॅक्सी एस 4 ज्यावेळी लाँच झाला, त्यावेळी त्याची किंमत ४१,५०० रुपये होती. आता सॅमसंग इडियाच्या ई-स्टोअरमध्ये या फोनची किंमत १२०० रुपयांनी कमी होणार आहे. म्हणजेच आता सॅमसंग गॅलॅक्सी एस 4 आता ४०,३०० रुपयांना उपलब्ध होणार आहे.

सॅमसंग एस 4 ची किंमत सॅमसंग इंडियाने जरी आत्ता कमी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी अनेक ई- कॉमर्स वेबसाइट्सवर आधीपासूनच हा मोबाइल कमी किमतीत विकला जात आहे. ४० हजार रुपयांत सॅमसंग गॅलॅक्सी एस 4 विकला जात आहे. त्यामुळे सॅमसंगला ही किंमत अजून कमी करावी लागण्याची शक्यता आहे. तसंच सॅमसंगमध्ये १२ महिन्यांसाठी EMI चा पर्यायही उपलब्ध आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, May 29, 2013, 17:37


comments powered by Disqus