एक ना दोन, आता सॅमसंगचा ३ सीमचा फोन!, samsung galaxy star trio launched in brazil

एक ना दोन, आता सॅमसंगचा ३ सीमचा फोन!

एक ना दोन, आता सॅमसंगचा ३ सीमचा फोन!
www.24taas.com, झी मीडिया, रिओ द जनेरो
कोरियाची मोबाईल कंपनी सॅमसंगने नवा हँडसेट सादर केला आहे. यात एक नाही दोन नाही तर तब्बल तीन सीमकार्ड आपण वापरू शकतो. गॅलेक्सी स्टार ट्रायो असे या फोनचे नाव असून ब्राझीलमध्ये तो लॉन्च करण्यात आला. लवकरच तो भारतात दाखल होणार आहे.

एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार हा फोन एलजीच्या ट्रिपल सीम फोन ऑप्टिमस ए१ ट्रायला टक्कर देण्यासाठी बाजारात आणाला आहे. हा फोन क्वालकॉम एमएसएण ७२२५ ए चिपसेटने चालतो. आणि हा सिंगल कोअर प्रोसेसर आहे.
हा ३.१ इंच स्क्रिनचा फोन असून तो क्यूव्हीजीए आहे. त्याची रॅम ५१२ एमबीची असून या फोनचा कॅमेरा ३.१ मेगा पिक्सलचा आहे. हा फोन ३ जी सपोर्ट करतो. यात वाय-फाय, जीपीएस, याची बॅटरी १३०० एमएएचची आहे. याची ऑपरेटिंग सिस्टीम एंड्रॉइट ४.१ जेलीबीन आहे.

हा फोन दोन रंगात येणार आहे. काळा आणि पांढरा असून आंतरराष्ट्रीय किंमत १६५ डॉलर म्हणजे सुमारे १० हजार रुपये आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 13, 2014, 18:12


comments powered by Disqus