Last Updated: Monday, September 16, 2013, 12:47
www.24taas.com , झी मीडिया, बर्लिनआघाडीची मोबाईल निर्माती कंपनी सॅमसंग या महिन्यात १५ हजारांहून कमी किमतीचा स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यामुळं स्मार्टफोन बाजारातील किंमतयुद्ध जोर धरण्याची शक्यता आहे.
सॅमसंगचे भारतातील प्रमुख विनीत तनेजा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही मध्यम किमतीचे दोन स्मार्टफोन बाजारात आणणार आहोत. या फोनमध्ये भारतातील नऊ प्रादेशिक भाषांचा पर्याय उपलब्ध असून या मोबाईल हॅडसेटची किंमत ५ हजार ते १५ हजाराच्या दरम्यान असेल. भारतात या किंमत पातळीतील मोबाईलची मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते.
अॅपलनं आपल्या कमी किमतीच्या आयफोनची गेल्या आठवड्यात घोषणा केल्यानंतर सॅमसंगचा हा स्मार्टफोन बाजारात येत आहे. यावरून बाजारातील स्पर्धेचा अंदाज येतो. सॅमसंगचा भारतीय मोबाईल बाजारात ४९ टक्के वाटा आहे. सॅमसंग प्रादेशिक भाषेतील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक भाषेचा पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहे.
सॅमसंगपुढं सध्या स्क्रीनचा आकार तोच ठेऊन फोनचा आकार छोटा करण्याचं आव्हान आहे. सध्या मोबाईल कंपन्याकंडून आकार कमी असण्यावर विशेष परिश्रम घेतले जात आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, September 16, 2013, 12:45